Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

टग्याचे अभंग

April 15, 2013

Search by Tags:  मान, माफ
जीभ घसरली l भलते बोलले
आता ते चालले l समाधीशी ll
थोरपदी येता l सांभाळावा मान
नको बकध्यान l ओळखावे ll
कितीवेळा काका l वाचवाया येई
पुरे दादाभाई l बोलण्याची ll
अंगामध्ये रग l नसावा उन्माद
ओढवले वाद l किती एक ll
धरणे कोरडी l रेती आणि खडी
कोण ओरबाडी l ताटातले ll
कुठे चुकलेले l कोण शोधणार
माफ करणार l किती वेळा ll
दिसेना हे पाणी l सत्तेचीही गाणी
जनतेला कोणी l विचारीना ll
पुरे झाली आता l मोठी टगेगिरी
पणती अंधारी l लावा जरा ll

-- शंकर पु. देव
Search by Tags:  मान, माफ
Top

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 1439 hits