Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

राज्य टग्यांचे..

April 09, 2013

Search by Tags:  राज्य, आंदोलन
होय, हे राज्य टग्यांचे आहे
सत्तेने फुगलेल्या फुग्यांचे आहे ..ll

दर निवडणूकीत आम्ही भरून घेतो वारा
पाप पुण्य नीती अनिती याला नसतो थारा
जनतेचे मत बाजार विकाऊ आहे
होय, हे राज्य टग्यांचे आहे..ll

दादागिरीवरच आमचा पोसलाय दम
कुणालाही कुठेही देऊ आम्ही दम
सत्तेच्या रथाचे चाक लाज कोडग्यांचे आहे
होय, हे राज्य टग्यांचे आहे..ll

आम्ही बोलत असता मध्येच अडवू नका
आमच्याशिवाय कुणी नवे घडवू नका
तुमचे हे आंदोलन फक्त बघ्यांचे आहे
होय, हे राज्य टग्यांचे आहे..ll

कुणीच बोलायचे नाही आमच्यापुढे जास्ती
ताबडतोब कुणाचीही आम्ही उतरवू मस्ती
जाल तिथे निशाण सोयर्‍या सग्यांचे आहे
होय, हे राज्य टग्यांचे आहे..ll

-- शंकर पु. देव
Search by Tags:  राज्य, आंदोलन
Top

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 3716 hits