Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
December 26, 2012
Visits : 731

वाटेवरती काचा आणिक कोल्हे बसले लपून गं सावध हरणी सावध वेडे टाक पाऊले जपून गं.. ll ll आयुष्याशी लढणे म्हणजे डोंबार्‍याचा खेळ तुझा तारेवरती तोल सावरीत सदा झेलीसी लाख वीजा पदरामध्ये जळत निखारे मनात काटे रुपून गं वाटेवरती काचा आणिक कोल्हे बसले लपून गं.. ll ll ओठ दाबूनी किती साहसी अन्यायाचा ससेमिरा तोड आता या जुलमी बेड्या रुढी आणिक परंपरा चक्रव्यूह हा टाक भेदूनी रूप कालीचे घेऊन गं वाटेवरती काचा आणिक कोल्हे बसले लपून गं.. ll ll ऊठ आता तू सोड लाज ही शीळा होऊनी पडू नको ओठामध्ये दु:ख दाबूनी अंधारी या रडू नको तुझRead More

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 731 hits