Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 08, 2013
Visits : 2112

आयुष्याच्या तव्यावरती संसाराची पोळी भाजता भाजता हाताला किती बसले चटके... मोजलेच नाही.. नवर्‍यासह लेकराबाळांचे करता करता मोठ्यांचा मान राखता राखता कितीदा वाकले... मोजलेच नाही.... जरा चुकले की घरच्यांची बाहेरच्यांची किती बोलणी खाल्ली, काळजाला किती घरं पडली.... मोजलेच नाही.. याच्यासाठी त्याच्यासाठी आणखीही कुणासाठी जगता जगता माझ्यासाठी मी अशी किती जगले.. मोजलेच नाही... पाखरे गेली फारच दूर डोळा आहे श्रावणपूर पैशाचा हा नुसता धूर निसटून गेले कोणते सूर... मोजलेच नाही.... - श्री. शंकर पु देवRead More

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 2112 hits