Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
December 19, 2011
Visits : 5427

भुकेल्या माणसाच्या पोटात दोन घास जावेत याबाबत कुणाचेच दुमत असणार नाही. स्वातंत्र्यानंतर साठपेक्षा जास्त वर्षे उलटून गेल्यावर आपण एवढी अपेक्षा ठेवली तर त्यात गैर काहीच नाही. एका बाजूला निम्मी प्रजा अर्धपोटी जगत असताना टनावारी बटाटे रस्त्यावर फेकून दिले जातात. कांद्याची फेकाफेक होते, टॉमेटोच्या नशिबी तेच येते. याचे कारण म्हणजे वितरण व्यवस्थेतील दोष आहे. एकूण शेतीमालाच्या उत्पादनात तीस टक्के माल फेकून दिला जातो किंवा नासाडीमुळे फुकट जातो अशी सरकारी आकडेवारीच सांगते. आपल्यासारख्या शेतीप्रधान देशात शेतीमालाचे उतRead More

December 12, 2011
Visits : 13389

गांधी आणि गांधीवाद या दोन शब्दांची जबरदस्त मोहिनी आपल्या भारतात आहे. भारताबाहेरही गांधीवाद मानणारेही बरेच लोक आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात बापूजींनी जे विचार पुढे आणले ते नव्य युगात कितपत यशस्वी होतील याबाबत बरीच मतमतांतरे आहेत. गांधीविचार हे पुर्णपणे आदर्श आहेत यावर अनेकांचा विश्वास नाही. सदासर्वकाळ गांधीवादी विचार प्रश्न सोडवतील असेही नाही. पण म्हणून गांधीवाद पूर्णपणे फेकूनही देता येत नाही. अहिंसा व सत्याग्रह ही त्यांची मोठी देणगी असली तरी या वाटेने केंव्हा जायचे याचे तारतम्य गांधीविचारधारेप्रमाणे वागणाRead More

December 03, 2011
Visits : 9958

दरवर्षी येणा-या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारतीय लोकशाहीचे गोडवे गायले जातात. जगातील सर्वात मोठया लोकशाहीचा मोठ्या प्रमाणात उदो-उदो केला जातो. नेते मंडळी, अभिनेते, कलाकार यांच्या मुलाखती घेऊन आपल्या प्रजातंत्राचे वारेमाप कौतुक केले जाते. अशा वेळी मनात एक सवाल कायम येत राहतो आणि तो म्हणजे या जनतंत्राला आपण खरच लायक आहोत काय? लोकशाहीच्या नावाखाली मुठभर लोकांची हुकूमशाही येथे राज्य करते आहे असे चित्र सध्या दिसत आहे. संसदेची दोनही सभागृहे देशातील लोकांचे प्रतिनिधीत्व करतात असे म्हटले जाते. पण या सभागृहात बसणारRead More

Shankar Deo's Blog

Blog Stats
  • 28774 hits